Description
सुगम मराठी व्याकरण व लेखन – 54वी आवृत्ती (Set of 2 Books)
५४ व्या सुधारित आवृत्तीची मुख्य वैशिष्ट्ये
- अधिकाधिक अचूकतेच्या व स्पष्टतेच्या दृष्टीने संपादकीय समितीतील व्याकरणतज्ज्ञांनी सुचविलेले बदल , आवश्यक तेथे वाढीव मजकूर व स्पष्टीकरणे.
- अधिक सुटसुटीत , अभ्यास करण्यास सुलभ अशी रचना
- प्रयोग , संधी , नाव , लिंग , वाचन , सामान्यरूप , क्रियापदे या घटकांमध्ये वाढीव उदाहरणे
- संकल्पना स्पष्टतेसाठी आवश्यकतेनुसार तक्ते
- शब्दशक्ती घटकामध्ये शब्दशक्तींच्या उपप्रकारांचे सविस्तर मार्गदर्शन
- वाक्यपृथक्करण घटकामध्ये अधिक विश्लेषण , तक्ते व वाढीव उदाहरणे
- आवश्यक तेथे प्रकरणाच्या शेवटी संदर्भ व माहिती देणाऱ्या टिपा समाविष्ट
- पुस्तकाच्या शेवटच्या पानावर संदर्भसूचीही दिली आहे .
- लेखन विभागामध्ये सुरुवातीला त्या त्या लेखन प्रकारच्या तंत्राची , मांडणीपद्धतीची , मार्गदर्शनपर चर्चा केली आहे . निबंध विषय , त्याला अनुसरून मुद्दे व त्यातून निबंध कसा आकाराला येईल याचे तंत्र विद्यार्थ्यांना यातून आत्मसात करता येईल .
- या पुस्तकाबरोबर समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द , शब्दसमूहाबद्दल एक शब्द , वाक्प्रचार , म्हणी , अलंकारिक शब्द अशा भाषावैभवाचा संग्रह असलेले शब्दरत्न हे स्वतंत्र पुस्तक अधिक विस्तारित स्वरूपात भेट देण्यात येत आहे .
- या पुस्तकसंचाचा अध्ययनाने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा मराठी विषयाचा अभ्यास परिपूर्ण होईल अशी खात्री आहे .
सुगम मराठी व्याकरण व लेखन
मराठी व्याकरणातील अंतिम शब्द
- संधी , समास यासह संपूर्ण व्याकरण , वृत्ते , अलंकार , शुद्धलेखन यांचे सोप्या भाषेत सोदाहरण स्पष्टीकरण
- महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा आयोगासह इतर स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार अद्ययावत केलेल्या लेखनविभागामध्ये निबंधलेखन , पत्रलेखन , सारांशलेखन , गद्य आकलन , भाषांतर , मुलाखत अशा उपयोजित लेखनाचे सविस्तर मार्गदर्शन
शब्दरत्न
समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द , वाक्प्रचार व म्हणी अशा मराठी भाषेतील शब्दवैभवाचे संकलन
- वाक्प्रचार – २००० पेक्षा जास्त
- म्हणी – १००० पेक्षा जास्त
- समानार्थी शब्द – १००० पेक्षा जास्त
- विरुद्धार्थी शब्द – १७०० पेक्षा जास्त
- शब्दसमूहाबद्दल एक शब्द – ४०० पेक्षा जास्त
- एका शब्दाचे निरनिराळे अर्थ – ४०० पेक्षा जास्त
- अलंकारिक शब्द – ४०० पेक्षा जास्त
- लेखन नियमानुसार शब्द – ३००० पेक्षा जास्त
- पारिभाषिक शब्द – १७०० पेक्षा जास्त
Reviews
There are no reviews yet.